OnePlus चा एक वेगळाच अंदाज यावर्षी दिसत आहे. कंपनीनं आपल्या हँडसेटची संख्या वाढवली आहे. तसेच किफायतशीर सेगमेंटमध्ये देखील वनप्लस फोन्स दिसत आहेत. आता एका हाय एन्ड वनप्लसची माहिती समोर आली आहे. कंपनी लवकरच आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन OnePlus 10 Ultra सादर करू शकते. OnePlus 10 सीरीजमध्ये OnePlus 10 Pro आणि OnePlus 10R नंतर हा डिवाइस येऊ शकतो. सोबत OnePlus 10 येण्याची देखील शक्यता आहे.
टिप्सटर Yogesh Brar नं ट्विटरवर आगामी OnePlus 10 Ultra च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. त्यानुसार हा डिवाइस नेक्सट जनरेशन Qualcomm Snapdragon 8 Gen 1+ प्रोससेरसह बाजारात येईल. जो क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असू शकतो. कंपनी या डिवाइसमध्ये हाय क्वॉलिटी कॅमेरा सेन्सर्सचा वापर करू शकते. हा पहिला OnePlus असेल ज्यात पेरिस्कोप लेन्स मिळू शकते.
OnePlus 10 Ultra चे लीक स्पेक्स
जुन्या लिक्सनुसार वनप्लस 10 अल्ट्रा फोनमध्ये Android 12 आधारित Oxygen OS 12 मिळेल. यातील डिस्प्ले QHD+ रिजोल्यूशन असलेला AMOLED पॅनल असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. वर सांगितल्याप्रमाणे हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 Plus प्रोसेसरसह बाजारात येईल. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 80W SuperVooC वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W AirVooC वायरलेस चार्जिंगसह देण्यात येईल.
OnePlus 10 देखील होऊ शकतो लाँच
लीक्सनुसार, OnePlus 10 Ultra सोबत OnePlus 10 स्मार्टफोन देखील सादर केला जाऊ शकतो. ज्यात 6.7 इंचाचा FHD+ LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. प्रोसेसिंगसाठी MediaTek Dimensity 9000 किंवा Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळू शकतो. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. 50MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यातील 4,800mAh ची बॅटरी 150W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकते.