हँडसेट निर्माती कंपनी वनप्लस ४ एप्रिल रोजी नॉर्ड सीरिज अंतर्गत लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite लॉन्च करणार आहे. या सीरिज अंतर्गत लेटेस्ट फोन लॉन्च होण्याआधी गेल्या वर्षी लॉन्च झालेला OnePlus 10R च्या किमतीत दुसऱ्यांना कपात करण्यात आली आहे. यावेळी या फोनच्या किमतीत ३ हजारांनी कपात करण्यात आली आहे.
OnePlus 10R Price in IndiaOnePlus 10R चा 8GB+128GB व्हेरिएंट Rs 38,999 (80W), 12GB+256GB व्हेरिएंट Rs 42,999 (80W) आणि 12GB+256GB व्हेरिएंट Rs 43,999 (150W) मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
पण गेल्या वर्षी या हँडसेटच्या किमतीत ४ हजारांनी कपात केल्यानंतर हा फोन अनुक्रमे ३४,९९९ रुपये, ३८,९९९ रुपये आणि ३९,९९९ रुपयांना विकला जात होता. आता या OnePlus मोबाइल फोनची किंमत ३,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे, त्यानंतर तुम्ही हे मॉडेल अनुक्रमे ३१,९९९ रुपये, ३५,९९९ रुपये आणि ३६,९९९ रुपयांना खरेदी करू शकाल. फॉरेस्ट ग्रीन आणि सिएरा ब्लॅक या दोन रंगांमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
OnePlus 10R Specificationsस्क्रीन: फोनमध्ये 120 Hz पर्यंत डायनॅमिक रिफ्रेश रेटसह 6.7-इंच फुल एचडी प्लस (1080×2412 पिक्सेल) डिस्प्ले आहे.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी OnePlus 10R मध्ये Octa core MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे आहेत, 50MP Sony IMX766 प्रायमरी सेन्सर, 8MP Sony IMX355 अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर. OnePlus 10R मध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: Endurance प्रकारात 150W SuperVOOC चार्ज सपोर्ट आहे ज्यामध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी ३ मिनिटांत फोनच्या बॅटरीच्या ३०% पर्यंत चार्ज करण्याचा दावा केला जातो. 80W फास्ट सपोर्ट असलेल्या व्हेरियंटमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी ३२ मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते.