शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

सिक्रेट माहिती लीक! OnePlus 10R आणि Nord CE 2 Lite ची भारतीय किंमत आली समोर 

By सिद्धेश जाधव | Published: April 23, 2022 7:35 PM

टिपस्टर अभिषेक यादवनं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 2 Lite च्या 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील.

28 एप्रिलला भारतात OnePlus चे दोन डिवाइस येणार आहेत. यातील OnePlus 10R एक स्वस्त फ्लॅगशिप अनुभव देखील तर OnePlus Nord CE 2 Lite कंपनीचा सर्वात स्वस्त मोबाईल असेल. लाँच इव्हेंटसाठी फक्त काही दिवस शिल्लक असताना या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत लीक झाली आहे. त्यामुळे तुम्ही हे हँडसेट तुमच्या बजेटमध्ये बसत आहेत की नाही ते ठरवू शकता.  

OnePlus Nord CE 2 Lite ची किंमत 

टिपस्टर अभिषेक यादवनं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 2 Lite च्या 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील. तर 8GB रॅम 128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये असेल. टिपस्टर योगेश ब्रारनुसार, छोटा व्हेरिएंट 17,999 रुपये आणि मोठा मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकला जाईल.  

OnePlus 10R  ची किंमत 

योगेश ब्रारनं OnePlus 10R ची किंमत लीक केली आहे. या फोनचा 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला बेस मॉडेल 38,999 रुपयांमध्ये लाँच होईल. तर 12GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये ठेवण्यात येईल.  

OnePlus 10R चे लीक स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 10R स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि HDR 10+ ला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेटचा वापर करेल. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा डिवाइस Android 12 वर आधारित OxygenOS 12 वर काम करेल.  

OnePlus 10R च्या मागे असेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर मिळू शकतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची Sony IMX355 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.   

हा पहिला वनप्लस डिवाइस असू शकतो ज्यात अलर्ट स्लायडर दिला जाणार नाही. फोनमध्ये Dolby Audio स्पीकर, NFC आणि High-Res Audio असे फीचर्स मिळतील. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी असू शकते, जी 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

 
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान