OnePlus 10T 5G किंवा OnePlus 10RT 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. हा फोन यंदा लाँच होणारा कंपनीचा शेवटचा फ्लॅगशिप असू शकतो. एप्रिलमध्ये देखील या हँडसेटची माहिती लीक झाली होती. परंतु आता आलेल्या लिक्समधून संपूर्ण चित्र स्पष्ट होत आहे. हा फोन “Ovaltine” कोडनेमसह दिसला असून यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळेल, असं सांगण्यात आलं आहे.
टिपस्टरनुसार, OnePlus 10T स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen+ 1 आणि MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर असलेल्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये येईल. हा फोन 2022 च्या उत्तरार्धात सादर केला जाऊ शकतो.
OnePlus 10T चे लीक स्पेसिफिकेशन्स
वनप्लसच्या या आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ Fluid AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz LTPO 2.0 रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen+ 1 किंवा MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर असणायची शक्यता आहे. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा फ्लॅगशिप फोन Android 12 बेस्ड OxygenOS सह येऊ शकतो.
OnePlus 10T चे कॅमेरा फीचर्स पाहता, फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल. तसेच यात 16MP चा अल्ट्रा वाईड आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 6, Bluetooth 5.2 आणि USB Type C सारखे फीचर्स मिळतील. तसेच, यात 2,400mAh + 2,400mAh असे दोन बॅटरी सेल मिळून 4,800mAh चा बॅटरी बॅकअप मिळेल. हा फोन 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच, फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग फीचर देखील मिळू शकतं.