वनप्लस इंडिया आपल्या काही जुन्या स्मार्टफोन मॉडेल्सची बॅटरी मोफत बदलून देत आहे. कंपनी भारतात वनप्लस 3, वनप्लस 5 सीरीज आणि वनप्लस 6 सीरीजमधील स्मार्टफोनची बॅटरी मोफत बदलून देत आहे, अशी माहिती एका रेडिट युजरने दिली आहे. या ऑफरमध्ये युजर्सकडून बॅटरीसाठी एक रुपया देखील घेतला जाणार नाही, परंतु ग्राहकांना लेबर चार्जेस द्यावे लागतील.
OnePlus Battery Replacement ऑफर
वनप्लसने काही जुन्या स्मार्टफोन्सच्या बॅटरीज बदलण्याची ऑफर सादर केली आहे. या ऑफरची माहिती रेडिटच्या माध्यमातून समोर आली आहे. बॅटरी जरी मोफत मिळत असली तरी ग्राहकांना लेबर चार्जेस द्यावे लागणार आहेत. ही एक वॉक-इन सर्विस आहे, त्यामुळे तुमचा मोबाईल तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावा लागेल.
जे वनप्लस युजर्स जुना फोन दीर्घकाळ वापरण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही चांगली ऑफर आहे. रेडिटनुसार OnePlus 5T ची बॅटरी बदलून घेण्यासाठी फक्त 473 रुपये द्यावे लागतील. कंपनीने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु जुन्या मॉडेल्सच्या बॅटरीजचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणल्याचे रेडिट पोस्टमधून समजले आहे.
आगामी OnePlus 9 RT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. हा फोन OxygenOS 12 सह लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल. रिपोर्टनुसार या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870प्लस चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी या वनप्लस फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात येईल. वनप्लस 9 आरटी मधील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.