चीनची कंपनी OnePlus ने यंदाचा दुसरा फ्लॅगशिप फोन OnePlus 6T मंगळवारी भारतात लाँच केला. गेल्या मे महिन्यातच OnePlus 6 हा फोन लाँच करण्यात आला होता. जाणून घेऊयात या दोन्ही फोनमधील फरक.
OnePlus 6 च्या तुलनेत 400 एमएएचनी जास्त बॅटरी 6T मध्ये देण्यात आली आहे. OnePlus 6 मध्ये 3300 एमएएच बॅटरी डॅश चार्जला सपोर्ट करत होती. तर 6T ची 3700 एमएएचची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 6T ची बॅटरी 6 पेक्षा 23 टक्के जास्त काळ चालत असून अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये ती दिवसभर चार्ज राहते.
OnePlus 6T मध्ये केवळ दोनच स्टोरेज व्हेरिअंट देण्यात आले आहेत. तर 6 मध्ये तीन स्टोरेज व्हेरिअंट होते. 6T मध्ये 128 जीबी आणि 256 जीबी व्हेरिअंट असून OnePlus 6 मध्ये 64 जीबी व्हेरिअंटही मिळत आहे.
साम्य काय?दोन्ही फोनमध्ये प्रोसेसर सारखाच देण्यात आला आहे. तसेच रॅमही 6 आणि 8 जीबी देण्यात आली आहे. दोन्ही फोनमध्ये कॅमेरा सारखेच आहेत. मागे 16 मेगापिक्सल प्रायमरी आणि 20 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तर पुढे सेल्फी 16 मेगापिक्सल देण्यात आला आहे.
किंमत...OnePlus 6 ची भारतातील किंमत 6/128 जीबी व्हेरिअंटची किंमत 37,999; 8/128 जीबीची किंमत 41,999; 8/128 जीबीची किंमत 45,999 रुपये आहे.