चीनच्या OnePlus कंपनीने सोमवारी न्युयॉर्कमध्ये अखेर नवा OnePlus 6T लाँच केला. आज हा फोन भारतात लाँच होणार आहे. नव्या मोबाइल मध्ये ड्रॉप नॉच डिस्प्ले, ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह ड्युल कॅमेरा दिला आहे. तसेच नवी ऑपरेटिंग सिस्टिम पाय देखील देण्यात आली आहे.
कॉर्निंग गोरिला ग्लास 6, 6.4 इंचाची ऑप्टिक अॅमोल्ड स्क्रीन 19.5:9 या अस्पेक्ट रेशोसह पाठीमागे 20 आणि 16 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे. फेस अनलॉक फिचरसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरामध्ये सोनीचा IMX 371 सेन्सर वापरण्यात आला आहे. लो लाईट फोटोग्राफीसाठी फ्लॅशशिवाय चालणारे नाईटस्केप हे फिचर देण्यात आले आहे.
आज भारतीयांसाठी इव्हेंटभारतात आज रात्री 8.30 वाजता दिल्लीतील केडीजीडब्ल्यू स्टेडीअमवर हा लाँचिंग इव्हेंट होणार आहे. अॅमेझॉनवर हा मोबाईल 1 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून आगाऊ बुकिंग सुरु आहे. 1 हजार रुपयांमध्ये बुकिंग केल्यानंतर 1500 रुपयांचा टाईप-सी बुलेट हेडफोन मोफत मिळणार आहे. तसेच 500 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. तसेच जिओ अॅपवर 5400 रुपयांचा कॅशबॅक, सिटी आणि आयसीआयसीआय बँकेकडून 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. अॅमेझॉन पेवर 1000 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे.