शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

OnePlus चा धमाका; 7th Anniversary Sale मध्ये जबरदस्त डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 10:46 AM

OnePlus 7th Anniversary Sale: या सेलमध्ये कंपनी OnePlus 8 आणि OnePlus 8T सह दुसऱ्या प्रॉडक्ट्सवर देखील ऑफर देऊ करत आहे. कंपनीने युजरसाठी इन्स्टंट डिस्काऊंट, नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक सारख्या ऑफर देऊ केल्या आहेत. 

चीनची मोठी प्रिमिअम स्मार्टफोन बनविणारी कंपनी OnePlus ला सात वर्षे झाली आहेत. यामुळे या कंपनीने धमाकेदार '7th Anniversary Sale' आयोजित केला आहे. या सेलमध्ये कंपनी OnePlus 8 आणि OnePlus 8T सह दुसऱ्या प्रॉडक्ट्सवर देखील ऑफर देऊ करत आहे. कंपनीने युजरसाठी इन्स्टंट डिस्काऊंट, नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक सारख्या ऑफर देऊ केल्या आहेत. 

या सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे ट्रान्झेक्शन केल्यानंतर इन्स्टंट डिस्काऊंटचा फायदा मिळणार आहे. युजर या सेलमध्ये HDFC Bank च्या कार्डद्वारे वनप्लस 8T खरेदी करत असेल तर त्याला २००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. तर HDFC Bank च्या कार्डद्वारे वनप्लस 8 सीरीज खरेदी केल्यास युजरला ३००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. इन्स्टंट म्हणजे खरेदीवेळी हे पैसे मूळ किंमतीतूवन वजा होणार आहेत. कंपनीने सांगितले की १७ आणि १८ डिसेंबरला Amazon आणि Flipkart वर ऑडिओ प्रॉडक्टवर १० टक्के सूट दिली जाणार आहे. 

कंपनी वनप्लस स्टोर अ‍ॅपवरून खरेदी केल्यास युजरला ५०० रुपयांचे डिस्काऊंट व्हाऊचर देत आहे. या अ‍ॅपवरून वनप्लसची पॉवर बँक खरेदी केल्यास युजरला सर्व ऑडिओ प्रॉडक्टवर १० टक्के सूट दिली जाणार आहे. आजच्या दिवशी वनप्लस एक्सपीरियंस स्टोअरवर जाणाऱ्या पहिल्या १० ग्राहकांना कंपनी 3 हजार रुपयांचे एक्सेसरीज कुपन देणार आहे. अशाप्रकारे ११ ते ३० नंबरच्या ग्राहकांना २००० रुपये आणि ३१ ते ७० नंबरच्या ग्राहकांना ५०० रुपयांचे कॉम्प्लिमेंटरी एक्सेसरीज कुपन दिले जाणार आहे. 

टीव्हीवरही ऑफरवनप्लसच्या सातव्या अ‍ॅनिव्हर्सरी सेलमध्ये OnePlus Y सिरीजच्या टीव्हीवर  डिस्काऊंट ऑफर करण्यात आला आहे. या मध्ये ३२ इंचाच्या आणि ४३ इंचाच्या टीव्हीवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय HDFC बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्ड ईएमआयवर खरेदी केल्यास ४००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. कंपनी युजरला रेड केबल लाईफ ऑफर देत आहे. याद्वारे कोणत्याही वनप्लसच्या डिव्हाईसला अपग्रेड केल्यास त्यावर ३००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलFlipkartफ्लिपकार्टamazonअ‍ॅमेझॉन