OnePlus लवकरच भारतात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus RT नावानं सादर करणार आहे. हा फोन याच महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल, असं बातम्यांमधून समोर आलं आहे. कदाचित त्याचमुळे वनप्लसच्या फोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. आता OnePlus 9 Pro 5G Phone वर Amazon India नं 10,000 रुपयांच्या डिस्काउंटची घोषणा केली आहे.
हा डिस्काउंट मिळवण्यासाठी ग्राहकांना दोन ऑफर्स एकत्र अप्लाय कराव्या लागतील. Amazon या फोनसोबत 5,000 रुपयांचा कूपन मिळत आहे. तसेच ICICI Bank क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अजून 5,000 रूपये ऑफ होतील. त्यामुळे OnePlus 9 Pro 5G चा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 64,999 ऐवजी 54,999 मध्ये विकत घेता येईल.
OnePlus 9 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 Pro मध्ये कंपनीनं 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 3216x1400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएसवर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.
OnePlus 9 Pro मध्ये मागील बाजूला 4 कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनचादेखील मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 8 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.
पॉवर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 65W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते OnePlus 9 Pro हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो.