शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

पुढील आठवड्यात येतोय फ्लॅगशिप किलर; शक्तिशाली OnePlus 9RT ची लाँच डेट आली समोर 

By सिद्धेश जाधव | Published: October 08, 2021 1:13 PM

Oneplus 9RT Price In India: OnePlus 9 RT स्मार्टफोन येत्या 13 ऑक्टोबरला टेक मार्केटमध्ये लाँच केला जाईल. हा फोन कंपनीच्या चिनी वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे.

वनप्लस मोबाईलच्या आगामी OnePlus 9 RT ची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक लिक्स आणि रिपोर्ट्समधून या फोनच्या स्पेसीफिकेशन्स आणि फीचर्ससह किंमतीची माहिती देखील समोर आली आहे. आता हा फोन कंपनीच्या चिनी वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. तसेच OnePlus 9 RT स्मार्टफोन येत्या 13 ऑक्टोबरला टेक मार्केटमध्ये लाँच केला जाईल, अशी घोषणा कंपनीने केली आहे.  

13 ऑक्टोबरला OnePlus 9 RT स्मार्टफोन अधिकृतपणे सादर केला जाईल. सर्वप्रथम हा फोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये सादर केला जाईल. त्यानंतर हा फोन भारतसह जगभरातील बाजारपेठांमध्ये पाऊल टाकेल. OnePlus 9RT स्मार्टफोन वनप्लस चायनाच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे आणि 13 ऑक्टोबरला या फोनची किंमत सांगण्यात येईल.  

OnePlus 9 RT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स   

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. हा डिवाइस अँड्रॉइड ओएस आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी वनप्लस 9 आरटी मध्ये 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिली जाऊ शकते.    

हा मोबाईल लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. गीकबेंचनुसार या फोनमध्ये 1.80गीगाहर्ट्ज बेस आणि 2.84गीगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. लिस्टिंगमधील कोडनेममधून हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह सादर केला जाईल, असे समजले आहे. वनप्लसच्या या आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये 12GB रॅम मिळेल, या पेक्षा जास्त व्हेरिएंटसह हा फोन बाजारात उपलब्ध होऊ शकतो. 

OnePlus 9 RT ची संभाव्य किंमत  

वनप्लस 9 आरटीच्या किंमतीची माहिती प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने लीक केली आहे. या लीकमध्ये हा फोन 2,000 युआनमध्ये सादर केला जाईल असे सांगण्यात आले आहे. ही किंमत 23,200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. लिक्सटरने ही किंमत 3,000 युआन म्हणजे 34,700 रुपयांपर्यंत देखील जाऊ शकते, असे सांगितले आहे. 39,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या OnePlus 9R च्या तुलनेत ही किंमत खूप कमी आहे.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान