OnePlus ने काही महिन्यांपूर्वी OnePlus 9 सीरिज Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह सादर केली होती. क्वालकॉमचा शाक्तशाली फ्लॅगशिप प्रोसेसर असताना देखील वनप्लसने बॅंचमार्क अॅपमध्ये डिवाइसची परफॉर्मन्स वाढवण्यासाठी फेरफार केल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. गीकबेंच प्लॅटफॉर्मवर OnePlus 9 Pro स्मार्टफोनमध्ये विचित्र हालचाली होत आहेत असा दावा AnandTech च्या रिपोर्टमध्ये केला गेला आहे. या रिपोर्टनंतर Geekbench ने OnePlus 9 सीरिज आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली आहे. विशेष म्हणजे रियलमीने देखील यापूर्वी Realme GT 5G च्या AnTuTu बेंचमार्क टेस्टमध्ये गडबड केली होती.
OnePlus 9 आणि OnePlus 9 pro दोन्ही फोनमध्ये अनेक अॅप्सच्या परफॉर्मन्समध्ये फरक जाणवतो, असा दावा AnandTech ने रिपोर्टमध्ये केला आहे. वनप्लस आपल्या सर्वात वेगवान कोरपासून काही लोकप्रिय ऍप्सना दूर ठेवतो, त्यामुळे वेब ब्राउजिंग सारख्या सोप्प्या कामाचा वेग कमी होतो. अनेक चाचण्या केल्यानंतर AnandTech ने हा निष्कर्ष काढल्याचे म्हटले आहे. अनेक लोकप्रिय नॉन बेंचमार्क अॅप्समध्ये या फोनची परफॉर्मन्स खूप स्लो आहे तर बेंचमार्क आणि इतर अॅप्समध्ये या फोनची परफॉर्मन्स दमदार असते.
Geekbench ची प्रतिक्रिया
बेंचमार्किंग स्कोरमध्ये वनप्लसने केलेली गडबड समोर आल्यानंतर Geekbench ने OnePlus 9 सीरिज अँड्रॉइड बेंचमार्क चार्टवरून हटवली आहे. जुन्या वनप्लस डिवाइसेसमध्ये देखील अशीच लबाडी करण्यात आली आहे कि नाही याचा देखील तपास गीकबेंच करत आहे, असे देखील बेंचमार्किंग वेबसाईटने सांगितले. चांगले बेंचमार्किंग स्कोर मिळवण्यासाठी वनप्लसने ऍप आयडेंटिफायरचा वापर केला, ही बाब निराशाजनक असल्याचे देखील गीकबेंचने ट्वीटमध्ये म्हटले आहे.