OnePlus आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा फोन ‘वनप्लस 9’ सीरीजमध्ये OnePlus 9T नव्हे तर OnePlus 9 RT नावाने सादर केला जाईल. आतापर्यंत लिक्स आणि रिपोर्ट्समधून या स्मार्टफोनची बरीचशी माहिती समोर आली आहे. परंतु हा फोन बाजारात कधी येईल हे समजले नव्हते. आता एका ताज्या रिपोर्टनुसार वनप्लस 9 आरटी स्मार्टफोन 15 October ला भारतात सादर केला जाऊ शकतो.
OnePlus 9 RT च्या लाँचबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ऑनलीक्सने आपल्या ट्वीटर अकॉउंटवरून सांगितले आहे कि वनप्लस कंपनी आपला हा आगामी फोन ऑक्टोबर मध्ये लाँच करेल. वनप्लस 9 आरटी 15 ऑक्टोबरला सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा फोन काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केला जाणार आहे आणि यात भारताचा समावेश आहे.
OnePlus 9 RT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार, OnePlus 9 RT स्मार्टफोनमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळू शकतो. हा एक अॅमोलेड पॅनल असेल. हा फोन अँड्रॉइड 12 वर आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. म्हणजे OnePlus 9 RT कंपनीच्या OxygenOS 12 सह येणारा पहिला स्मार्टफोन असेल. OnePlus 9 RT स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870प्लस चिपसेट दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिली जाऊ शकते.