OnePlus 9RT स्मार्टफोन आणि OnePlus Buds Z2 ट्रू-वायरलेस स्टीरियो ईयरफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतात. कंपनीने या दोन्ही डिवाइसेसचा लाँच सोशल मीडियावरून टीज केला आहे. वनप्लस 9 RT भारतात OnePlus RT नावानं सादर केला जाऊ शकतो. हा फोन लाँच झाल्यानंतर भारतातील वनप्लस 9, वनप्लस 9R आणि वनप्लस 8T स्मार्टफोन बंद केले जाऊ शकतात.
OnePlus Buds Z2
OnePlus Buds Z2 मध्ये 11mm चा डायनॅमिक ड्राईव्हर देण्यात आला आहे. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth v5.2 मिळेल. या TWS इयरबड्समध्ये अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचर देण्यात आलं आहे. हे ईयरफोन IP55-सर्टिफाइड आहेत तर चार्जिंग केस IPX4 रेटिंगसह येतात. टच कंट्रोल आणि ट्रान्स्परन्सी मोडसह येणारे हे बड्स 38 तासांचा बॅटरी बॅकअप देतात.
OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9RT मध्ये 6.62-चाचा फुल एचडी+ E4 अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.