शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T

By सिद्धेश जाधव | Published: July 03, 2021 1:02 PM

OnePlus 9T with ColorOS 11: OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. 

OnePlus सध्या वनप्लस 9 सीरिजमधील आगामी स्मार्टफोन्सची तयारी करत आहे. Oneplus 9 नंतर या सीरिजमध्ये OnePlus 9T लाँच केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. कंपनी हा स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत लाँच करू शकते, असे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. तसेच OnePlus 9T 5G स्मार्टफोनमध्ये ओप्पोची ऑपरेटिंग सिस्टम देण्यात येईल, असा दावा देखील लिक्समध्ये करण्यात आला आहे. OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.  (OnePlus 9T with ColorOS 11, 108MP Hasselblad quad cameras)

OnePlus 9T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लीक रिपोर्ट्सनुसार OnePlus 9T मध्ये LTPO Samsung E4 फ्लेक्सिबल अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. OnePlus 9T मध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 SoC मिळू शकते. कंपनीने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये OnePlus 8T लाँच केला होता. त्यामुळे वनप्लस 9T स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत किंवा सप्टेंबरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. याच काळात वनप्लसचा OnePlus Nord 2 देखील बाजारात दाखल होऊ शकतो.  

OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स   

याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये  MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल.    

OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट