OnePlus Ace Racing Edition चीनमध्ये सादर करण्यात आला आहे आणि लवकरच हा डिवाइस भारतात देखील येऊ शकतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 81oo Max SoC, 12GB RAM, 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. चला जाणून घेऊया OnePlus Ace Racing Edition स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.
OnePlus Ace Racing Edition चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Ace Racing Edition मध्ये 6.59 इंचाचा FHD+ LTPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्प्लिंग रेटला सपोर्ट करतो. या शानदार स्मार्टफोनमध्ये कंपनीनं MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट दिला आहे. सोबत 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळते. फोन Android 12 वर बेस्ड ColorOS 12 वर चालतो.
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा कॅमेरा मिळतो. या 5G फोनमध्ये Wi-Fi 6 व ब्लूटूथ 5.3 सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. वनप्लस फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
किंमत
OnePlus Ace Racing Edition स्मार्टफोनच्या 8GB/128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,999 युआन (जवळपास 23,000 रुपये) आहे. 8GB/256GB मॉडेल 2,199 युआन (जवळपास 25,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर हायएन्ड मॉडेल 12GB RAM व 256GB स्टोरेजसह 2,499 युआन (जवळपास 28,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन Athletics Grey आणि Lightspeed Blue कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.