Oneplus Band गेल्यावर्षी ग्राहकांच्या भेटीला आला होता. आता कंपनीच्या पहिल्यावहिल्या Fitness Tracker ची किंमत कमी करण्यात आली आहे. कंपनीनं किफायतशीर वनप्लस बँडची किंमत 900 रुपयांनी कमी केली आहे. 13 एक्सारसाईज मोड, हार्ट रेट सेन्सर, आणि SpO2 सेन्सर असलेल्या डिवाइसची नवी किंमत पुढे दिली आहे.
OnePlus Band ची नवीन किंमत
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये लाँचच्या वेळी वनप्लस बँडची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली होती. आता 900 रुपयांच्या कपातीनंतर हा डिवाइस ग्राहकांना 1,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची विक्री OnePlus.in आणि Amazon India वरून ब्लॅक कलरमध्ये केली जात आहे. तसेच सिटी बँकेच्या कार्ड धारकांना यावर 10 इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल.
OnePlus Band चे स्पेसिफिकेशन
वनप्लस बँडमध्ये 1.1 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टचस्क्रीन डिस्प्ले 126x249 पिक्सल रिजॉल्यूशन आणि अॅडजस्टेबल ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या फिटनेस ट्रॅकरमध्ये हार्ट रेट सेन्सर, स्लिप ट्रॅकिंग आणि SpO2 मॉनिटर असे हेल्थ फीचर्स मिळतात.
वनप्लस बँडमध्ये 13 वेगवेगळे एक्स्सरसाइज मोड देण्यात आले आहे. यातील IP68 रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासून बँड सुरक्षित राहतो. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन 5.0 ला सपोर्ट मिळतो आणि अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमसह चालतो. फिटनेस बँडमध्ये 110mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी सिंगल चार्जवर 14 दिवस वापरता येते.