गुरुवारी प्रीमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने आपला फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन OnePlus Nord 2 5G भारतात लाँच केला. या स्मार्टफोन सोबत कंपनीने नवीन ट्रू वायरलेस स्टिरियो (TWS) इयरबड्स OnePlus Buds Pro देखील लाँच केले आहेत. या नवीन इयरबड्समध्ये हायब्रीड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि IPX4 सर्टिफिकेशन्स असे फीचर्स देण्यात आले आहेत.
OnePlus Buds Pro ची किंमत
वनप्लस बड्स प्रो ट्रू वायरलेस इयरबड्सच्या भारतीय किंमतीची आणि उपलब्धतेची माहिती कंपनीने दिलेली नाही. परंतु जागतिक बाजारात हे बड्स 149.99 डॉलर (अंदाजे 11,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. OnePlus Buds Pro इयरबड्स Matte Black आणि Glossy White रंगात उपलब्ध होतील.
OnePlus Buds Pro चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Buds Pro हे ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स आहेत. या इयरबड्समध्ये 11mm चे डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे इयरबड्स प्रेशर-सेन्सेटिव्ह कंट्रोल्सने नियंत्रित करता येतात. वनप्लसने या इयरबड्समध्ये तीन माईक दिले आहेत जे नॉइज रिडक्शनसाठी मदत करतात. यात एक्सट्रीम, फेंट आणि स्मार्ट असे तीन अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन मोडस मिळतात, त्याचबरोबर हायब्रीड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर देखील मिळते.
OnePlus Buds Pro ची चार्जिंग केस IPX4 वॉटर-रेजिस्टंट आहे, तर इयरबड्स मध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससाठी IP44 सर्टिफिकेशन मिळते. हे बड्स यूएसबी टाइप-सी आणि वायरलेस चार्जिंगने चार्ज करता येतात. ब्लूटूथ 5.2 सपोर्टसह येणारे इयरबड्स अँड्रॉइड क्विक पेयरिंगला सपोर्ट करतात. चार्जिंग केससह हे वनप्लस बड्स प्रो 38 तासांची बॅटरी लाइफ देऊ शकतात.