OnePlus Buds Z2 भारतात लाँच झाले आहेत. केला आहे. हे इयरबड्स जुन्या OnePlus Buds Pro पेक्षा खूप कमी किंमतीती सादर करण्यात आले आहेत. काल झालेल्या OnePlus 9RT च्या लाँच इव्हेंटमधून हे इयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन(ANC), दमदार बॅटरी बॅकअप आणि खास ट्रान्सपरंट मोड मिळतो.
OnePlus Buds Z2 चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Buds Z2 मध्ये अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर देण्यात आलं आहे. जे आजूबाजूचा 40db पर्यंतचा आवाज कॅन्सलेशन करू शकतं. सोबत यात डॉल्बी एटमॉसला सपोर्टसह 11 मिमी बास-ट्यून डायनॅमिक ड्रॉयव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. या बड्समध्ये AAC/SBC कोडॅक्स सपोर्टसह ब्लूटूथ 5.2 कनेक्टिव्हिटी मिळते.
इन-ईयर डिजाइनसह येणाऱ्या या वनप्लस बड्समध्ये एक ट्रान्सपरंट मोड देण्यात देण्यात आला आहे. या मोडमध्ये तुम्ही आजूबाजूच्या आवाजाचं भान ठेऊन म्युजिक ऐकू शकता. यात कॉल आणि नॉइज कॅन्सलेशनसाठी तीन माईक देण्यात आले आहेत. यातील लो-लेटेंसी मोड 94ms ची लेटन्सी देऊ शकतो.
यात IP55 रेटिंग पाणी आणि धुळीपासून संरक्षण करते. म्युजिक, कॉल आणि व्हॉल्युम कंट्रोलसाठी यात टच फंक्शन देण्यात आले आहेत. यात वायरलेस चार्ज सपोर्ट मिळत नाही परंतु एक यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. सिंगल चार्जवर हे बड्स चार्जिंग केससह 38 तास वापरता येतात. तर फक्त बड्सचा बॅटरी बॅकअप 7 तासांचा आहे. यात 520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 5 तासांचा म्यूजिक प्लेबॅक देऊ शकते.
OnePlus Buds Z2 ची किंमत
OnePlus Buds Z2 ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत OnePlus Buds Pro पेक्षा अर्धी आहे. हे इयरबड्स ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. याची विक्री 18 जानेवारीपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि वनप्लसच्या अधिकृत वेबसाईटवर सुरु होईल.
हे देखील वाचा:
12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर
नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला होऊ शकतो लाखोंचा दंड