OnePlus ने सर्वात स्वस्त 108MP कॅमेरावाला फोन लाँच केला आहे. OnePlus Nord CE 3 Lite असे या फोनचे नाव असून तो काहीसा रिअलमीच्या १० प्रो सारखाच दिसतो. अर्थात या सर्व कंपन्या व्हिवोच्याच असून त्या काही काही अंतराने एक सारखे फोन परंतू वेगळ्या ब्रँडच्या नावे काढत असतात. काही दिवसांनी व्हिवोचा देखील T2 टर्बो फोन येत आहे. यामध्ये देखील हेच स्पेसिफिकेशन तुम्हाला दिसणार आहेत.
OnePlus Nord CE 3 Lite स्मार्टफोन दोन प्रकारात येतो. त्याच्या 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB LPDDR4x RAM Plus आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. फोन मध्ये ८ जीबी रॅम वाढविता येणार आहे. पेस्टल लाइम आणि क्रोमॅटिक या दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे.
6.72 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. रिफ्रेश रेट सपोर्ट १२० हर्ट्झ आहे, यामुळे तुम्हाला व्हिडीओ स्मूथ दिसणार आहेत. 60 Hz ते 120 Hz दरम्यान रिफ्रेश रेट आपोआप अॅडजस्ट होणार आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून मुख्य कॅमेरा हा १०८ मेगा पिक्सलचा आहे. २ एमपी डेप्थ सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात दिला आहे. सेल्फीसाठी 16 MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
यामध्ये जुनाच Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट देण्यात आला आहे. Android 13 असून त्यावर OxygenOS 13.1 देण्यात आली आहे. 5000mAh बॅटरी देण्यात आली असून त्याचा चार्जिंग स्पीड 67W SUPERVOOC आहे. परंतू, 80W फास्ट चार्जर देण्यात आला आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरातील अन्य फास्ट चार्जिंग फोनही चार्ज करू शकणार आहात.