वनप्लसचा पहिला वेअरेबल बँड OnePlus Band हा २०२१ च्या पहिल्या तिमाहीत भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. आता OnePlus Band शी निगडित माहिती कंपनीनं शेअर करण्यास सुरूवात केली आहे. याव्यतिरिक्त एका परिचित टिप्स्टरनं त्या बँडची किंमत किती असेल आणि त्यात कोणते फीचर्स असतील हेदेखील सांगितलं आहे. टिप्स्टर इशान अग्रवालनं OnePlus Band शी निगडीत माहिती शेअर केली आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार OnePlus चा पहिला फिटनेस ट्रॅकर देशात ११ जानेवारीला लाँच केला जाणार आहे. याची किंमत २ हजार ४९९ रूपये इतकी असेल. तसंच समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये १.१ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या बँडमध्ये हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटरिंगसाठई एक SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंग सपोर्ट मिळणार आहे.
भन्नाट फीचर्ससह OnePlus Band लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे खास?
By जयदीप दाभोळकर | Updated: January 5, 2021 12:46 IST
या बँडमध्ये अॅमोलेड डिस्प्लेसह अनेक नवे आणि अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
भन्नाट फीचर्ससह OnePlus Band लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे खास?
ठळक मुद्देया बँडसमोर Mi Smart Band 5 आणि Mi Smart Band 4 चं असणार आव्हान बँडमध्ये १३ स्पोर्ट्स मोडचा समावेश