OnePlus ने सुरुवात फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन्स सादर करून केली होती. हे फोन्स कमी किंमतीत फ्लॅगशिप स्पेसीफाकेशन्स देत होते. त्यानंतर कंपनी हळूहळू प्रीमियम स्मार्टफोनकडे वळली. सध्या वनप्लस नॉर्ड सीरिजच्या माध्यमातून मिडरेंज स्मार्टफोन सादर करत आहे. हे स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकले जातात. परंतु आता वनप्लस कथितरित्या 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे, अशी बातमी समोर आली आहे.
टिप्सटर योगेश बरारने माहिती दिली आहे कि, वनप्लस 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन सादर करू इच्छित आहे. यावर्षी वनप्लस आणि ओपोचे विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीमध्ये अनेक बदल होत आहेत. यापैकी एक बदल म्हणजे भारतात 20k (20 हजार) पेक्षा कमी किंमतीत एक फोन सादर करणे. हा फोन आगामी 2022 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत देशात सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती टिपस्टरने दिली आहे.
Oneplus Nord 2 मध्ये स्फोट
OnePlus Nord सीरीज फोनमध्ये वारंवार स्फोट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला वनप्लस नॉर्ड 2 5G यात आग लागल्याची बातमी आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा OnePlus Nord 2 5G एका बॉम्बप्रमाणे फुटल्याची घटना घडली आहे. दिल्लीत राहणारे वकील गौरव गुलाटी यांच्या नवीन वनप्लस नॉर्ड 2 5G मध्ये स्फोट झाला आणि त्यात गौरव यांचा जीव थोडक्यात बचावला.
या घटनेनंतर गौरव यांनी वनप्लसविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते कंपनीविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहेत. गौरव यांच्या फोनमध्ये झालेल्या स्फोटानंतर त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर वनप्लसने त्यांच्याशी संवाद साधला. वनप्लसकडून एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आला त्याने तपासासाठी फोनसोबत घेऊन जाण्याची मागणी केली. परंतु गौरव यांनी पोलीस प्रकरण असल्याने फोन घेऊन जाण्यास मनाई केली. या घटनेनंतर गौरव यांनी वनप्लसच्या कारभारावर चिंता व्यक्त केली.