शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

वनप्लसचा नवा फोन आला, १२ वी सिरीज लाँच; किंमत कधी सत्तरावर पोहोचली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 13:37 IST

वनप्लस अ‍ॅप्पल सारखाच फक्त सिरीजचा नंबर वाढवत चालला आहे. परंतु या प्रिमिअम ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये नाविण्य असे काहीच नाहीय.

अ‍ॅप्पलच्या पावलावर पाऊल ठेवत वनप्लसने १२ वी सिरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने आताचा लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला आहे. याचबरोबर 6.82 इंचाचा 2K ProXDR डिस्प्ले दिला आहे. 

वनप्लस अ‍ॅप्पल सारखाच फक्त सिरीजचा नंबर वाढवत चालला आहे. परंतु या प्रिमिअम ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये नाविण्य असे काहीच नाहीय. फक्त सिरीजचा नंबर आणि किंमत वाढवण्यातच कंपनी मश्गुल आहे.  सॅमसंगने नुकतेच एआय फिचर फोनमध्ये दिले आहे.

किंमतीमध्ये वनप्लसने निराश केले आहे. ३०-३५ हजारांना मिळणारे वनप्लसचे फोन कधी सत्तर हजारावर जाऊन पोहोचले ते देखील कळलेले नाहीय. OnePlus चा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटचा फोन 64,999 रुपयांना मिळणार आहे. तर 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजचा फोन 69,999 रुपयांना मिळणार आहे. या किंमतीत iQOO 12, ओप्पो सारखे फोन येत आहेत, जे वनप्लसपेक्षा जास्त कॅमेरा क्वालिटी, डिस्प्ले आणि बॅटरी, प्रोसेसर देत आहेत. 

वनप्लस १२ मध्ये सोनी IMX581 लेन्सचा ५० मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबतच 64MP ओमनीविजन OV64B टेलीफोटो सेंसर देण्यात आला आहे. 120x डिजिटल झूमही सपोर्ट करतो. 48MP Sony IMX581 अल्ट्रा-वाइड सेंसर देण्यात आला आहे. कमी प्रकाशात वनप्लसचे कॅमेरे चांगले परफॉर्म करत नाहीत. य़ात तरी वनप्लसने ही कमतरता दूर केली असेल, अशी अपेक्षा आहे. सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. 5400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंग देण्यात आले आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल