शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

दमदार OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन भारतात लाँच; मिळणार 12GB रॅम, 65W चार्जिंग आणि 50MP कॅमेरा 

By सिद्धेश जाधव | Published: July 22, 2021 8:40 PM

Oneplus Nord 2 5G Price: OnePlus Nord 2 5G भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनचा 6GB + 128GB व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आज OnePlus ने भारतात नवीन फ्लॅगशिप कीलर OnePlus Nord 2 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्टसह 50MP ट्रिपल कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग, MediaTek Dimensity 1200 AI चिपसेट आणि 12GB रॅम असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. दमदार फीचर्स असलेल्या या वनप्लस नॉर्ड 2 5जी फोनची किंमत भारतात 27,999 रुपयांपासून सुरु होईल. हा फोन 28 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. (Oneplus nord 2 5g phone launched in india)

OnePlus Nord 2 5G ची किंमत 

OnePlus Nord 2 5G भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनचा 6GB + 128GB व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तसेच 8GB + 128GB व्हेरिएंट 29,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिएंट 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 28 जुलैपासून  कंपनीच्या वेबसाइट सोबतच अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.  

OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 6.43-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच कारतण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1800 पिक्सल रिजोल्यूशनसह आला आहे. या फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90हर्ट्ज आहे. हा वनप्लस फोन अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजन ओएस 11.3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 एआय चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी OnePlus Nord 2 5G मध्ये एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. 

फोटोग्राफी सेगमेंट पाहता, OnePlus Nord 2 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योटिरीसाठी OnePlus Nord 2 5G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे दोन्ही फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65W वॉर्प चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडamazonअ‍ॅमेझॉन