वनप्लस नॉर्ड 2 सध्या चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आहे. पुन्हा एकदा या स्मार्टफोनचा स्फोट झाला आहे, यावेळी युजर गंभीररीत्या जखमी झाला आहे. वनप्लसने कंपनी त्या ग्राहकाच्या संपर्कात असल्याची माहिती दिली होती आणि या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले होते. आता बातमी आली आहे कि वनप्लसने या अपघातात सापडलेल्या युजरला फोनचे पैसे परत दिले आहेत आणि उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे.
OnePlus Nord 2 blast
याच आठवड्यात Twitter वरून OnePlus Nord 2 चा स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला होता. या अपघातात फोनचा युजर गंभीररीत्या भाजल्याचे सांगण्यात आले होते. आग इतकी भयंकर होती कि फोनचा कव्हर देखील वितळून युजरच्या पायाला चिकटला होता. या स्फोटाचे काही फोटो देखील ट्विटरवर शेयर करण्यात आले होते.
या नंतर वनप्लसने एक स्टेटमेंट प्रसिद्ध केली. कंपनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत आहे, तसेच आपण युजरच्या संपर्कात असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आले होते.
आता MySmartPrice ने प्रकरणाची पुढील माहिती दिली आहे. OnePlus India ने युजरचा जळालेला OnePlus Nord 2 डिवाइस ताब्यात घेतला आहे. हा डिवाइस कंपनीच्या पुण्यातील सर्विस सेंटरवर तपासासाठी पाठवण्यात आला आहे. युजरने वेबसाईटला सांगितले आहे कि कंपनीने फोनचे पैसे परत दिले आहेत. तसेच उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे.