फ्लॅगशिप किलर म्हणून ओळख असलेल्या वनप्लस मोबाईलची ओळख बदलत असल्याचे दिसत आहे. यावर्षी कंपनीने OnePlus Nord 2 स्मार्टफोन सादर केला होता. परंतु कमी किंमतीत चांगले फीचर्स देणारा फोन अशी ओळख निर्माण होण्याऐवजी या फोनची ओळख Blast होणारा स्मार्टफोन अशी झाली आहे. आता पुन्हा एकदा OnePlus Nord 2 ब्लास्ट होऊन आग लागली आहे. यावेळी हा मोबाईल फोन एक तरुणाच्या पॅन्टच्या खिशातच Blast झाला आहे. त्यामुळे युजरच्या पायाला गंभीर जखम झाली आहे.
OnePlus Nord 2 Blast ची भयानक घटना भारतातील आहे. एका एक युजरने ट्वीटरच्या माध्यमातून या दुर्घटनेची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये ब्लास्ट झालेल्या वनप्लस नॉर्ड 2 स्मार्टफोनसह जखमी तरुणाचे फोटो देखील जोडण्यात आले आहेत. तसेच ट्विटमध्ये युजरच्या आयुष्याशी खेळ न करण्याची मागणी करण्यात आली आहे.
OnePlus Nord 2 Blast
वनप्लस नॉर्ड 2 च्या ब्लास्टची माहिती Suhit Sharma नावाच्या ट्वीटर युजरने दिली आहे. सुहितने ट्वीटमध्ये ब्लास्ट कसा झाला याची माहिती दिली नाही. परंतु शेयर केलेल्या फोटोजमधून गंभीर दुर्घटनेचे परिणाम दिसून येतात. ट्वीटर युजरने OnePlus कंपनीला परिणाम भोगण्यास तयार राहण्याची चेतावणी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार OnePlus Nord 2 स्मार्टफोन युजरच्या पॅन्टच्या खिशात असताना त्याला आग लागली. टाईट जीन्समधून फोन काढणे जमले नाही त्यामुळे खिश्याला देखील आग लागली. हा स्फोट ऐकता मोठा होता कि तरुणाच्या जांघेवरील त्वचा देखील भाजली गेली. तसेच फोनचा कव्हर देखील वितळून त्वचेला चिकटल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. या घटनेबाबत वनप्लस कडून ट्विटरवर संगणकीय रिप्लाय व्यतिरिक्त इतर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.