OnePlus लवकरच आपल्या वनप्लस 9 सीरिजचा OnePlus 9RT स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. परंतु त्याआधी कंपनीच्या आता अजून एका 5G Phone ची माहिती समोर आली आहे. टिपस्टर योगेश ब्रारनं 91मोबाईल्सला आगामी OnePlus Nord 2 CE च्या भारतीय लाँचची टाइमलाईन सांगितली आहे. हा फोन बीआयएसवर OnePlus Ivan या कोडनेम आणि IV2201 या मॉडेलनंबरसह लिस्ट करण्यात आला होता.
रिपोर्ट्सनुसार हा फोन पुढील वर्षी भारतीयांच्या भेटीला येईल. 2022 च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये वनप्लसचा स्वस्त 5G Phone भारतात येऊ शकतो. OnePlus Nord 2 CE ची किंमत 24,000 ते 28,000 रुपयांच्या दरम्यान, असू शकते.
OnePlus Nord 2 CE चे लीक स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 2 CE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 900 5G प्रोसेसरची ताकद देण्यात येईल. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन Android 12 आधारित OxygenOS 12 वर चालेल.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स असेल. हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. या आगामी वनप्लस फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या डिवाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.