प्रीमियम स्मार्टफोन लाँच केल्यानंतर चिनी कंपनी वनप्लसने OnePlus Nord च्या माध्यमातून पुन्हा एकदा मिड रेंज सेगमेंटमध्ये पाऊल टाकले होते. आता या सीरिजमध्ये कंपनी दुसरा स्मार्टफोन लाँच करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगामी OnePlus Nord 2 चे फोटो, लुक, डिजाईन व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आता बातमी आली आहे कि OnePlus Nord 2 स्मार्टफोन 24 जुलै रोजी भारतात लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus Nord 2 च्या लाँच डेटची माहिती प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. मुकुलने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन नवीन फोन जुलैच्या शेवटी बाजारात दाखल होईल. या स्मार्टफोनच्या लाँचची ठराविक तारीख मात्र टिप्सटरने सांगितलेली नाही. परंतु अंदाज लावला आहे OnePlus Nord 2 स्मार्टफोन 24 जुलै किंवा त्यानंतर काही हा फोन बाजारात दाखल होऊ शकतो.
OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल.
OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे.