OnePlus Nord 2 लवकरच लाँच होणार आहे. या मिड रेंज स्मार्टफोनच्या लाँच डेट, डिस्प्ले साइजसह अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा याआधी झाला आहे. आता माहिती मिळाली आहे कि हा वनप्लसचा पहिला स्मार्टफोन असेल, जो नवीन OxygenOS आणि ColorOS ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाईल. वनप्लसने गेल्या महिन्यात घोषणा केली होती कि, वनप्लसची ऑपरेटिंग सिस्टम OxygenOS आता ओप्पोच्या ऑपरेटिंग सिस्टम ColorOS सह इंटिग्रेट होऊन येईल. रिपोर्टनुसार, OnePlus Nord 2 पहिला स्मार्टफोन असेल, जो या नवीन संमिश्र सॉफ्टवेयरसह लाँच केला जाईल. (Oneplus Nord 2 Oppo Integrated Software)
OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल.
OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे.