शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त ठरला! 80W फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम असलेला स्वस्त OnePlus Nord 2T 5G वेबसाईटवर लिस्ट  

By सिद्धेश जाधव | Updated: June 27, 2022 16:05 IST

OnePlus Nord 2T स्मार्टफोन वनप्लस इंडियाच्या वेबसाईट आणि Amazon इंडियाच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे.

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या फोनच्या प्रोडक्ट पेजवर “Coming Soon” असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे याआधी आलेल्या लिक्सवर शिक्कामोर्तब झाला आहे. जागतिक बाजारात OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन लाँच झाल्यामुळे या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे, तसेच किंमत आणि उपलब्धतेची माहिती लिक्स रिपोर्टमधून समजली आहे.  

OnePlus Nord 2T ची किंमत  

रिपोर्टनुसार, हा फोन 1 जुलैला संध्याकाळी 7 वाजता लाँच केला जाईल. तर 5 जुलैपासून या हँडसेटची विक्री सुरु होईल. वनप्लस नॉर्ड 2टी चे दोन व्हेरिएंट भारतात लाँच केला जातील, यातील 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज असलेला हाय एन्ड मॉडेल 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स 

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 2T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा Sony IMX766 सेन्सर OIS सह मुख्य कॅमेऱ्याचं काम करतो. सोबत 8MP चा Sony IMX35 अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP तिसरा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.  

यात 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus Nord 2T 5G फोन Android 12 बेस्ड OxygenOS 12.1 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आहे, सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. OnePlus Nord 2T 5G मध्ये 4,500mAh ची बॅटरी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह मिळते.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान