OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन भारतात 17 फेब्रुवारीला लाँच होणार आहे, अशी माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. लिक्स आणि रिपोर्ट्समधून या फोनच्या स्पेक्सची माहिती देखील मिळाली आहे. तसेच आता OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनची संभाव्य किंमत देखील समजली आहे. चला जाणून घेऊया वनप्लसचा हा आगामी बजेट स्मार्टफोन किती रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
OnePlus Nord CE 2 5G ची किंमत
OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात येतील, असा दावा टिपस्टर अभिषेक यादवनं केला आहे. यातील 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये ठेवली जाऊ शकते. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मोठ्या व्हेरिएंटसाठी 24,999 रुपये मोजावे लागू शकतात.
OnePlus Nord CE 2 5G चे संभाव्य स्पेक्स
OnePlus Nord CE 2 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सर्टिफिकेशनसह बाजारात येईल. सोबत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा असेल. वनप्लसचा हा फोन ग्रे मिरर आणि बाहमास ब्लू कलरमध्ये सादर केला जाईल.
Nord CE 2 स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह सादर केला जाईल. यात ग्राफिक्ससाठी Mali G68 GPU आणि 5G मॉडेम दिला जाऊ शकतो. आगामी वनप्लस Android 11 वर चालेल. यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. जी micro-SD कार्डनं वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा सेन्सर मिळेल. फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा असेल. OnePlus Nord CE 2 स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.
हे देखील वाचा: