प्रिमिअम अँड्रॉईड फोन्ससाठी प्रसिद्ध असलेली कंपनी वनप्लसने नुकताच OnePlus Nord CE 4 Lite 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. परवडणाऱ्या श्रेणीतील ५ जी फोनमध्ये याची उपस्थिती असेल असा बऱ्यापैकी चांगली फिचर्स यात कंपनीने दिली आहेत. आम्ही हा फोन सुमारे १५ दिवस वापरून पाहिला. चला तर मग पाहुयात हा फोन कसा आहे ते...
वनप्लसने Nord CE 4 Lite मध्ये नवा प्रोसेसर वापरलेला नाहीय. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC हा फाईव्ह जी आल्यापासून परवडणाऱ्या फोन्समध्ये वापरला जाणारा, चांगला चाललेला प्रोससर देण्यात आला आहे. जो व्हॉट्सअप, ओटीटी अॅप्स, गेम्स आदी आरामात हाताळू शकतो. तसेच ग्राफीक्ससाठी Adreno 619 GPU हा गेमसाठी वगैरे उपयुक्त आहे. आम्हाला व्हिडीओ किंवा हलकेफुलके गेम खेळताना हिटिंग इश्यू जाणवला नाही. तसेच ग्राफीक्समध्ये लॅगही जाणवला नाही.
हा फोन 128GB आणि 256GB या स्टोरेजसह येतो. साधारणपणे आताच्या फोटो व्हिडीओ काढण्याच्या क्रेझला 256GB ची स्टोरेज स्पेस उपयुक्त आहे. परंतू, जर कमी वापर असलेल्या व्यक्तीला हा फोन घ्यायचा असेल तर 128GBची स्पेसही पुरेशी आहे. महत्वाचे म्हणजे दोन सीम कार्ड आणि त्याचबरोबर मेमरी कार्डही जोडता येते. यामुळे मेमरीची अधिकची गरजही पूर्ण होते. ८ जीबी रॅम सध्याच्या अॅप्स आणि वापरासाठी पुरेशी आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी, फिचर्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
वनप्लसने यावेळी फोनचा डिस्प्ले अपडेट केला आहे.6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग आणि व्हिडीओ एकदम स्मूथ प्ले होतात. तसेच उन्हात गेलात तर फोनचा डिस्प्ले तुम्हाला चांगली व्हिजिब्लिटी देतो. अॅमेझॉन प्राईम आणि इतर ओटीटीवर तुम्ही एचडी व्हिडीओ पाहू शकता. आम्ही वर्ल्डकपची फायनल जवळपास निम्मी या फोनवर पाहिली आहे. कुठेही लॅग किंवा तापल्याचे आम्हाला जाणवले नाही.
OnePlus Nord CE 4 Lite 5G मध्ये OxygenOS 14 वापरण्यात आली आहे. यात पुढील दोन वर्षे अपडेट मिळत राहणार आहेत. 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आलेला आहे. तसेच Type-C चार्जिंग, 80W चा चार्जर देण्यात आलेला आहे. ० ते १०० टक्के चार्जसाठी बरोबर १ तास लागतो. तसेच एकदा चार्ज केलेली बॅटरी ( 5,500mAh) दीड ते दोन दिवस वापरानुसार येते. स्पीकरचा आवाज बऱ्यापैकी मोठा आहे. स्क्रीनवरील कानाला लावायचा आणि खालील असे दोन्ही स्पीकरमधून आवाज येत असल्याने व्हिडीओ वगैरे पाहणे चांगले ठरते. हा फोन यावर खरेदी करू शकता...
कॅमेरा...वनप्लसने केलेला आणखी एक मोठा बदल म्हणजे कॅमेरा आहे. गेल्यावेळी १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला होता. आता ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. Sony LYT-600 सेन्सर वापरण्यात आला आहे. जो प्रकाशात चांगले फोटो काढतो परंतू अंधारात डिटेल्समध्ये धडपडताना दिसला. 16MP सेल्फी कॅमेरा ठीकठाक फोटो काढतो. कॅमेरावर चांगले काम करण्याची गरज आहे. काही फोटो आम्ही सोबत जोडत आहोत.
या फोनची किंमत १९९९९ रुपयांपासून सुरु होते. हा फोन खरेदी करण्यासाठी, फिचर्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा...