OnePlus Nord CE 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन ई-कॉमर्स साईट अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होईल. जर तुम्ही हा फोन विकत घेण्यास घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर जाऊन हा फोन खरेदी करू शकता. (OnePlus Nord CE 5G will be available on Amazon and OnePlus website from 16 Jun)
किंमत आणि ऑफर्स
या स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपयांपासून सुरु होते, हि किंमत फोनच्या 6GB रॅम आणि 128GB मॉडेलची आहे, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. या फोनचा सर्वात मोठा मॉडेल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 27,999 रुपये आहे.
या फोनची खरेदी करताना एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांचा डिस्कॉउंट मिळू शकतो. अमेझॉनकडून या फोनच्या खरेदीवर 6,000 रुपयांचे फायदे रिलायन्स जियो ग्राहकांना देण्यात येत आहेत. तसेच, अमेझॉन पे वापरणाऱ्या ग्राहकांना 500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक दिला जाईल.
OnePlus Nord CE 5G चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस नॉर्ड सीई 5जी स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुल-एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. तसेच, डिस्प्लेमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या नवीन नॉर्ड फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750जी 5G चिपसेट आणि Adreno 619 GPU दिला आहे.
फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 5G मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यात, 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मोनो लेंस सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. नॉर्ड सीई 5जी मध्ये 4,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.