OnePlus Nord N200 5G स्मार्टफोनच्या लाँचच्या बातमीला कंपनीने दुजोरा दिला आहे. वनप्लसचा हा स्मार्टफोन लवकरच अमेरिका आणि कॅनडामध्ये सादर केला जाऊ शकतो. वनप्लसचा हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह येईल, हा फोन गेल्यावर्षीच्या OnePlus Nord N100 चा उत्तराधिकारी असेल. आता पॉपुलर लीकस्टर इवान ब्लासने ट्विटरवर या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी काही रेंडर शेयर केले आहेत, त्यामुळे या फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. (Oneplus Nord N200 Specs leaked by evan blass)
OnePlus Nord N200 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लीकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord N200 मध्ये 6.49 इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 480 5G SoC सह Adreno 619 GPU, 4GB RAM आणि 64GB UFS 2.1 स्टोरेजसह सादर केला जाईल. हा फोन Android 11 वर आधारित OxygenOS कस्टम स्किनसह 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.
OnePlus Nord N200 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा असेल, त्याचबरोबर 2MP ची मॅक्रो लेंस आणि 2MP ची मोनोक्रोम लेंस मिळेल. वनप्लसच्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
OnePlus Nord N200 ची डिजाइन
OnePlus Nord N200 मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात येईल. तसेच फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो. मागे वनप्लसची ब्रँडिंग देखील असेल. फोनमध्ये उजवीकडे फिंगरप्रिंट सेन्सर एम्बडेडपावर बटण असेल. तर डावीकडे वॉल्यूम बटण दिले जाऊ शकतात.