OnePlus लवकरच आपला पहिला टॅबलेट OnePlus Pad सादर करणार आहे, अशी बातमी गेले कित्येक दिवस येत आहे. आता या डिवाइसच्या लाँचची महत्वाची माहिती मिळाली आहे. वनप्लसचा आगामी टॅबलेट भारतात 2022 च्या पूर्वार्धात सादर केला जाईल, असं 91Mobiles नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने सांगितलं आहे.
वनप्लसच्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही. परंतु हा टॅब पुढील वर्षी भारतात येईल, अशी माहिती मिळाली आहे. या टॅबचा भारतात कमीत कमी एक मॉडेल भारतात सादर केला जाईल. तसेच हा डिवाइस OnePlus 10 सीरीजसह भारतात येणार नाही, जी 2022 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होणार आहे.
OnePlus 10 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन
लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 10 Pro वर 125W फास्ट चार्जिंग मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय त्यात 5000mAh बॅटरी असू शकते. डिस्प्लेबाबत सांगायचं झालं तर यात 6.7-इंचाचा QHD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अनेक रेंडर्सनी आगामी OnePlus फ्लॅगशिप वर एक नवं कॅमेरा सेटअप दाखवलं आहे. फोनमध्ये रियर कॅमेरा मॉड्यूल, एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअपही दिलं जाऊ शकतं. याशिवाय समोर एक पंच-होल सेल्फी शूटर असू शकतो. OnePlus 10 Pro ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे कलर पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
इंटनेटवर वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबाबत चर्चा सुरू आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 GEN 1 चिपसेटसह येईल. हा क्वॉलकॉम मोबाइलसाठी नुकताच लाँच करण्यात आलेला फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. वनप्लसचे सीईओ पीट लाउ यांनी आता या वृत्ताला दुजोरा दिलाय.