वनप्लस मोबाईलने Harry Potter Limited Edition स्मार्टवॉच भारतात लाँच केला आहे. Warner Bros सह भागेदारीत सादर केलेला हा लिमिटेड एडिशन स्मार्टवॉच लोकप्रिय फिल्म आणि नॉवेल फ्रँचाइजी हॅरी पॉटरवर आधारित आहे. यासाठी कंपनीने ब्रॉन्ज कलरच्या डायल आणि हॉगवर्ट्सचे चिन्ह असलेल्या पट्ट्याचा वापर केला आहे. तसेच वॉच ऑन करताच हॅरी पॉटरचा लोगो दिसतो. त्याचबरोबर वॉच केसच्या पॉवर बटणमध्ये एक लाईटिंग बोल्ट देखील देण्यात आला आहे.
OnePlus Watch Harry Potter Limited Edition ची किंमत
वनप्लस स्मार्टवॉचच्या लिमिटेड एडिशनची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा वॉच 21 ऑक्टोबरपासून OnePlus.in, OnePlus Store App आणि ऑफलाईन वनप्लस स्टोरवरून विकत घेता येईल. तत्पूर्वी 20 ऑक्टोबरलाचा हा वॉच दुपारी 12 वाजल्यापासून OnePlus Store अॅपवर उपलब्ध होईल. या OnePlus वॉचच्या खरेदीसाठी ICICI आणि Kotak बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 1,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल.
OnePlus Watch Harry Potter Limited Edition चे स्पेक्स
Harry Potter Limited Edition मधील स्पेसिफिकेशन मात्र OnePlus Watch सारखेच आहेत. यात 454×454 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 1.39 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या वॉचमध्ये 110 पेक्षा जास्त वर्कआउट मोड मिळतात. फक्त 5 मिनिटांच्या चार्जवर हा स्मार्टवॉच दिवसभर वापरता येतो. यात 5ATM पर्यंत वॉटर रेजिस्टन्स आणि IP68 वॉटर रेजिस्टन्स मिळतो. OnePlus Watch Harry Potter Limited Edition, RTOS बेस्ड सॉफ्टवेयर चालतो. हेल्थ फीचर्स पाहता, यात हार्ट रेटिंग मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, SPo2 मॉनिटरिंग असे फीचर्स मिळतात.