OnePlus ने काही दिवसांपूर्वी आपला फ्लॅगशिप OnePlus 9RT भारतात सादर केला आहे. परंतु या स्मार्टफोनची किंमत सर्वांनाच परवडणारी नाही. यासाठीच कंपनीची OnePlus Nord सीरिज सादर करण्यात आली आहे. जी किफायतशीर स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. आतापर्यंत या सीरिजमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे फोन आले आहेत. परंतु लवकरच हे चित्र बदलणार असल्याचं दिसतंय.
टिपस्टर योगेश बरारनं 91मोबाईल्सला दिलेल्या माहितीनुसार लवकरच वनप्लसचा एक स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत लाँच केला जाईल. यावर्षी Nord 2 CE आणि Nord 3 नंतर हा स्वस्त वनप्लस देशात येईल.
स्वस्त OnePlus Nord चे लीक स्पेक्स
OnePlus Nord सीरीजमधील या आगामी स्मार्टफोनमध्ये अॅमोलेड डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. हा एक 5G Phone असेल, असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. कमी किंमतीत 5G देण्यासाठी कंपनी मीडियाटेकच्या प्रोसेसरचा वापर करू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागे 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
या रिपोर्टमधील महत्वाची बाब म्हणजे कंपनी यावर्षी नॉर्ड सीरिजमध्ये 3 स्मार्टफोन सादर करणार आहे. तसेच कंपनीचा नवा फ्लॅगशिप OnePlus 10 Pro देखील भारतात येणार आहे. फक्त निवडक स्मार्टफोन लाँच करणारी कंपनी यावर्षी आपल्या पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करणार असल्याचं दिसतं आहे.
हे देखील वाचा:
तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट