OnePlus नं फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणारी कंपनी ही ओळख खूप मागे टाकली आहे. कंपनी आता मिडरेंजमध्ये देखील नॉर्ड सीरिज अंतर्गत स्मार्टफोन सादर करत आहे. आता वनप्लसचा रहस्यमयी स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट FCC वर दिसला आहे. या लिस्टिंगमधील स्पेक्सवरून हा एक किफायती स्मार्टफोन असल्याचा अंदाज लावला जात आहे. जो नॉर्ड सीरिज अंतर्गत बाजारात येऊ शकतो.
FCC वर आगामी वनप्लस CPH2469 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. हे एक 4G LTE स्मार्टफोन आहे. FCC च्या फाईलिंगनुसार, ओप्पोनं OnePlus ला आपल्या कंपनीच्या नावानं ओप्पो फोन (CPH2387) मार्केट करण्याची परवानगी दिली आहे. CPH2387 हा थायलंडमध्ये आलेल्या Oppo A57 4G चा मॉडेल नंबर आहे.
थोडक्यात सांगायचं तर Oppo A57 4G स्मार्टफोन आता वनप्लसच्या ब्रॅंडिंगसह जागतिक बाजारात येईल. स्पेक्स तेच राहतील फक्त वनप्लस लोगो, नवीन बॅटरी कव्हर आणि रेड यूएसबी केबल देण्यात येईल. लिस्टिंगमधून 50MP + 2MP ड्युअल कॅमेरा सेटअपचा खुलासा झाला आहे. हा फोन OxygenOS 12.1 वर चालेल. तसेच यात SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची मोठी बॅटरी मिळेल.
Oppo A57 चे स्पेसिफिकेशन
Oppo A57 मध्ये 6.5 इंचाचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Helio G35 प्रोसेसरसह 3GB RAM आणि 64GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मागे 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्पेक्समुळे आगामी Nord स्मार्टफोन खूप स्वस्तात लाँच होईल अशी अपेक्षा आहे.