तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाइन फसवणूकही (Online Fraud) वाढू लागली आहे. फोनवर खोटी ओळख देऊन बँक खात्यातून पैसे काढण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. घोटाळेबाजांवर कारवाई करण्यासाठी भारत सरकारने हेल्पलाइन क्रमांक (Helpline Number) सुरू केला आहे. या हेल्पलाइन नंबरच्या मदतीने तुम्ही तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची त्वरित तक्रार करू शकता. जाणून घेऊया या प्रक्रियेबाबत…
155260 वर कॉल केल्यानंतर प्रकरण राज्य पोलिसांकडे वर्ग केले जाते. यानंतर पोलीस ऑपरेटर फसवणूकीच्या व्यवहाराचा तपशील आणि इतर वैयक्तिक माहिती घेतील. पोलीस ‘सिटिझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीम’ या फॉर्ममध्ये नोंदणी करतात. ते तिकीट स्थानिक बँक, वॉलेटसह शेअर केले जाते. आता संपूर्ण प्रकरण पीडित आणि घोटाळेबाज बँक यांच्यात असते.
… तर बँक पैसे होल्ड करेलतक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे पोचपावती क्रमांक (acknowledgement number) पाठविला जातो. त्यामध्ये असलेल्या लिंकमध्ये तुम्हाला २४ तासांच्या आत सर्व माहिती भरावी लागते. त्यानंतर तुमचे तिकीट बँकेच्या रिपोर्टिंग पोर्टलवर तुम्हाला दिसेल. अंतर्गत प्रणालीमध्ये तपशील तपासले जाऊ शकतात. जर आरोपीच्या खात्यात पैसे असतील तर बँक ते होल्ड करेल. बँक ते पैसे काढू शकणार नाही. स्कॅमरने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असल्यास, बँक दुसऱ्या बँकेसाठी तिकीट तयार करते आणि त्याचे पैसे तिथेही होल्ड होऊ शकतात.