ऑनलाईन शॉपिंगमध्ये आतापर्यंत अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु आता समोर आलेली फसवणुकीची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणात Flipkart आणि Amazon या दोन्ही दिग्गज ई-कॉमर्स वेबसाईट्सचा समावेश आहे. या नवीन प्रकरणात एका ग्राहकाने Amazon वरून पूर्ण पैसे देऊन फोन विकत घेतला आहे आणि Flipkart कडून त्यांना नोटिफिकेशन आली आहे कि जर त्यांनी उर्वरित पैसे दिले नाही तर डिवाइस ब्लॉक केला जाईल. चला जाणून घेऊया या प्रकरणात दोष कोणाचा आहे.
ट्विटर युजर @JBhattacharji ने या प्रकरणाची माहिती ट्वीट करून दिली आहे. त्यानुसार त्यांनी अॅमेझॉन इंडियावरून Samsung Galaxy S20 Plus स्मार्टफोन विकत घेतला होता. हा हँडसेट Divine India नावाच्या विक्रेत्याने नोव्हेंबर 2020 मध्ये अॅमेझॉनवर 57,449 रुपयांमध्ये विकला होता. आता 12 महिन्यानंतर Flipkart वरून मेसेज आला आहे कि त्यांनी उर्वरित पैसे दयावे किंवा स्मार्टफोन अपग्रेड करावा. फ्लिपकार्टने पैसे न दिल्यास स्मार्टफोन ब्लॉक करण्याची चेतावणी या नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
त्यानंतर ग्राहकाला समजले कि हा स्मार्टफोन Flipkart वरून Smart Upgrade Plan अंतगर्त विकत घेतला गेला होता. जिथे फक्त 70 टक्के रक्कम देऊन स्मार्टफोन विकत घेता येतो आणि 12 महिन्यानंतर 30 टक्के रक्कम द्यावी लागते किंवा नवीन स्मार्टफोन विकत घेऊन त्यावर अपग्रेड करावे लागते. फ्लिपकार्टवरील या ऑफर अंतर्गत घेतलेला हा फोन सेलरने नंतर अॅमेझॉनवर विकला आणि तिथून ग्राहकाने तो विकत घेतला. या प्रकरणात फ्लिपकार्ट कोणतीही मदत करणार नसल्याचे ग्राहकाने सांगितले आहे. तर अॅमेझॉनकडून यावर कोणतीही प्रतिक्रया आली नाही.