OPPO नं आपला बजेट सेगमेंटमधील पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीनं आज चीनमध्ये Oppo A11s स्मार्टफोन सादर केला आहे. ज्यात Snapdragon 460 चिपसेट, 8GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5,000mAh battery असे स्पेक्स देण्यात आले आहेत. या फोनची चीनमधील किंमत 11,500 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. चला जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स.
OPPO A11s चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो ए11एस 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. हा पंच-होल डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड कलरओएस 7.2 वर चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 460 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आला आहे. हा डिवाइस 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे.
फोटोग्राफीसाठी OPPO A11s स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटीसह यात रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक मिळतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.
OPPO A11s ची किंमत
ओप्पो ए11एस चे दोन व्हेरिएंट्स चीनमध्ये आले आहेत. यातील 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 999 युआन (सुमारे 11,500 रुपये) आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1199 युआन (सुमारे 14,000 रुपये) आहे.
हे देखील वाचा:
खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट
कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल