शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

शानदार लूक आणि दमदार बॅटरीसह कमी किंमतीत OPPO A16K स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: November 08, 2021 12:48 PM

OPPO A16K Price And Details: OPPO ने A-Series मध्ये नवीन बजेट स्मार्टफोन OPPO A16K नावाने सादर केला आहे. हा फोन फिलीपीन्समध्ये सादर करण्यात आला आहे.  

चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने आपल्या A-Series चा विस्तार केला आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये OPPO A16K फोन फिलीपीन्समध्ये सादर केला आहे. हा फोन स्लिम बॉडी, HD+ LCD डिस्प्ले आणि MediaTek Helio G35 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. हा फोन भारतातील OPPO A16 स्मार्टफोनचा लो बजेट व्हर्जन आहे. चला जाऊन घेऊया OPPO A16K चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत. 

OPPO A16K चे स्पेसिफिकेशन्स  

OPPO A16K आणि OPPO A16 च्या लूक आणि डिजाईनमध्ये जास्त फरक दिसत नाही. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाइन आणि सिंगल रियर कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. यात 6.52 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. 88.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येणारा हा फोन 480 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल.  

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Helio G35 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 3GB RAM आणि 32GB ची स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा मोबाईल Android 11 आधारित ColorOS 11.1 Lite वर चालतो.  

OPPO A16K च्या बॅक पॅनलवर एकच 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर कनेक्टिविटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.0, हेडफोन जॅक आणि USB Type C पोर्ट असे पर्याय मिळतात.  

OPPO A16K ची किंमत  

OPPO A16K चा एकच व्हेरिएंट बाजारात आला आहे. फिलिपिन्समध्ये हा फोन 6,999 PHP मध्ये विकत घेता येईल. ही किंमत 10,300 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा स्मार्टफोन भारतात आणि इतर बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल कि नाही हे मात्र अजून समजले नाही.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान