गेल्या महिन्यात बातमी आली होती कि OPPO आपल्या ‘ए’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. आता कंपनीच्या अधिकृत घोषणेच्या आधी नवीन OPPO A54s स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. अॅमेझॉनच्या लिस्टिंगमधून या फोनच्या फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती मिळाली आहे. लवकरच हा स्मार्टफोन विक्रीसाठी देखील उपलब्ध होईल.
OPPO A54s चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो ए54एस मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा एक टियरड्रॉप नॉच असलेला आयपीएस एलसीडी पॅनल आहे. हा ओप्पो मोबाईल IPX4 रेटिंगसह सादर केला जाईल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट दिला जाईल. यात 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.
फोटोग्राफीसाठी ओप्पो ए54एस स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. पॉवर बॅकअपसाठी ओप्पो ए54एस 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5000mAh ची बॅटरी मिळेल.
OPPO A54s ची किंमत
अॅमेझॉनवर OPPO A54s स्मार्टफोन 229.99 युरोमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत 20,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Pearl Blue आणि Crystal Black कलरमध्ये विकत घेता येईल. हा फोन भारतात कधी येईल हे मात्र अजून समजले नाही.