Oppo ने आपल्या ए सिरीजचा विस्तार करत नवीन Oppo A55s स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन कंपनीने जपानमध्ये सादर केला आहे. Oppo A55s स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 13 मेगापिक्सचा रियर कॅमेरा आणि Snapdragon 480 चिपसेट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Oppo A55s स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमत.
Oppo A55s ची किंमत
Oppo A55s स्मार्टफोन जापानमध्ये 33,800 जापनीज येन (सुमारे 22,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हा फोन भारतासह अन्य देशांमध्ये कधी उपलब्ध होईल, हे मात्र समजले नाही.
Oppo A55s चे स्पेसिफिकेशन्स
Oppo A55s स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये Bluetooth 5.0, ड्युअल बँड Wi-Fi, 4G सह VoLTE, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.
Oppo A55s स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनला Qualcomm Snapdragon 480 SoC चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. ओप्पोचा हा फोन Android 11 आधारित ColorOS 11 वर चालतो. या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.