शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

ओप्पोने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 5000mAh च्या दमदार बॅटरीसह OPPO A56 लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 26, 2021 12:36 PM

New 5G Phone Oppo A56 5G Launch Price Details: Oppo A56 5G स्मार्टफोन 11GB RAM, 5000mAh बॅटरी आणि Mideatek Dimensity 700 प्रोसेसरसह चीनमध्ये सादर करण्यात आला आहे.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने आपल्या गृह मार्केट चीनमध्ये नवीन Budget 5G Phone सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या ए सीरिज अंतर्गत OPPO A56 5G नावाने सादर करण्यात आला आहे. लवकरच हा फोन भारतासह जागतिक बाजारात देखील पाऊल टाकू शकतो. चला जाणून घेऊया मिडरेंज OPPO A56 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

OPPO A56 5G ची किंमत 

चीनमध्ये Oppo A56 5G चा एकच व्हेरिएंट उपलब्ध झाला आहे. ज्यात 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची  किंमत 1,599 युआन इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत 18,800 भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. हा फोन ब्लॅक, पर्पल आणि ब्लु रंगात विकत घेता येईल.  

Oppo A56 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo A56 5G चे स्पेसिफिकेशन पाहता, कंपनीने यात 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या फोनच्या प्रोसेसिंगसाठी ओप्पोने मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा एक ड्युअल बँड 5जी सपोर्टेड चिपसेट आहे. त्याचबरोबर डिवाइसमध्ये 6GB रॅम + 5GB एक्सटेंडेड रॅम मिळतो. तसेच 128GB ची एक्सपांडेबल स्टोरेज देखील देण्यात आली आहे. डिवाइस अँड्रॉइड 11-आधारित ColorOS 11.1 वर चालतो. 

फोटोग्राफीसाठी OPPO A56 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या 5G Oppo Phone मध्ये NFC सपोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये पॉवर बटनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :oppoओप्पोtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन