शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Published: September 14, 2017 8:00 AM

ओप्पो कंपनीने आपला ए ७१ हा स्मार्टफोन १२,९९० रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

ओप्पो कंपनीने आपला ए ७१ हा स्मार्टफोन १२,९९० रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे.

ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित कलर ३.१ ओएसवर चालणारा आहे. गोल्ड आणि ब्लॅक या रंगांमध्ये सादर करण्यात आलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टने या मॉडेलला खरेदी करणार्‍यांसाठी काही खास ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात प्रामुख्याने सुलभ हप्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रिलायन्स जिओने ओप्पो ए ७१च्या खरेदीदाराला ३९९ रूपयात तीन महिन्यांपर्यंत मोफत कॉलिंगसह ६० जीबी अतिरिक्त डाटा देण्याचे जाहीर केले आहे.

ओप्पो ए ७१ या मॉडेलमध्ये मेटलची युनिबॉडी प्रदान करण्यात आली आहे. यात ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर एमटी६७५० टी हा प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ३,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असेल.

ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन १३ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने युक्त आहे. यात एफ/२.२ अपार्चर, पीडीएएफ, एलईडी फ्लॅश आदी फिचर्स असतील. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून यात एफ/२.४ अपार्चर देण्यात आले आहे. यात ड्युअल सीमकार्डचा सपोर्ट असेल. तसेच यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, ई-कंपास आदी सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान