OPPO A77 5G स्मार्टफोन सध्या थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमुळे कंपनीच्या मिड रेंज पोर्टफोलियोची ताकद वाढली आहे. यात हाय रिफ्रेश रेट, 48 मेगापिक्सलचा कॅमेरा, मीडियाटेकच्या Dimensity 8-सीरीजचा 5G प्रोसेसर आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. लवकरच याच स्पेक्ससह OPPO A77 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री होऊ शकते.
OPPO A77 5G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A77 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी पॅनल देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 810 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6GB LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळते. देण्यात आला आहे. ओप्पोचा हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 स्किनवर चालतो.
OPPO A77 5G स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर मागे 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर असेलेला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. ओप्पोच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
OPPO A77 5G ची किंमत
OPPO A77 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. या एकमेव 6GB रॅम व 128GB असेलेल्या मॉडेलची किंमत 9,999 THB (सुमारे 22,600 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा ओप्पो स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि ओशियन ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.