OPPO आपल्या ‘ए’ सीरीज अंतर्गत नवीन 5G Phone सादर केला आहे. कंपनीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये OPPO A96 5G सादर केला आहे. Snapdragon 695 चिपसेट, 8GB RAM आणि 33W fast charging सह येणारा हा फोन लवकरच भारतीयांच्या भेटीला देखील येऊ शकतो. चला जाणून घेऊया OPPO A96 5G ची किंमत किती ठेवण्यात आली आहे.
OPPO A96 5G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A96 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8 जीबी रॅम आणि 5 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजे एकूण 13 जीबी रॅमची ताकद मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो.
ओप्पो ए96 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच-होल ओएलईडी डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅश, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप आहे. तर 16 मेगापिक्सलचा सेन्सर फ्रंट कॅमेऱ्याचं काम करतो. पॉवर बॅकअपसाठी यातील 4,500एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगने चार्ज करता येते.
OPPO A96 5G ची किंमत
ओप्पो ए96 5जी फोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1999 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 23,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Apricot Powder Warm Sun, Colored Glaze आणि Night Dream Night Star कलरमध्ये विकत घेता येईल. या ओप्पो मोबाईलच्या भारतीय लाँचची माहिती अजूनही समजली नाही.
हे देखील वाचा:
सर्वात स्वस्त 5G Phone! 6GB RAM सह Nokia लाँच केला दमदार स्मार्टफोन
Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत