Oppo नं आपल्या Inno Day Event 2021 मध्ये कमाल केली आहे. कंपनीनं Oppo Air Glass चष्मा सादर केला आहे. असिस्टेड रियालिटी (AR) टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या या विएरेबल डिवाइसची निर्मिती ओप्पोनं केली आहे. यातील स्पार्क मायक्रो प्रोजेक्टर डोळ्यांसमोर सर्व माहिती दाखवण्याचं काम करतो. हा एयर ग्लास पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान चीनमध्ये सादर केला जाईल. चला जाणून घेऊया या चष्म्याची वैशिष्ट्ये.
Oppo Air Glass
साध्या चष्म्याप्रमाणे ओप्पो एयर ग्लास वापरता येईल. हे ग्लासेस ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन रंगात विकत घेता येतील. सोबत दोन कस्टम फ्रेम अॅक्सेसरीज देखील कंपनी देणार आहे. ओप्पोनं याचा उल्लेख लाईटवेट मोनॉकल वेवगाइड डिवाइस म्हणून केला आहे. एयर ग्लासमध्ये ओप्पोनं बनवलेल्या मायक्रो प्रोजेक्टरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात अॅडव्हान्स मायक्रो एलईडी आणि कस्टम वेव टेक्नॉलजी देण्यात आली आहे.
एयर ग्लासमध्ये 16 लेव्हल ग्रे स्केल आणि 256 लेव्हल ग्रे स्केल असे दोन डिस्प्ले मोड मिळतील. हा डिस्प्ले 1400 निट्स पर्यंतच्या ब्राईटनेसला सपोर्ट करतो. त्यामुळे उन्हात देखील डिस्प्लेवरील माहिती डोळ्यांना दिसेल. हे ग्लासेस ओप्पो वॉच 2 किंवा Color OS11 आणि त्यावरील ओएस असलेल्या डिव्हाइसेसशी कनेक्ट करता येईल.
ओप्पो एयर ग्लास टच, व्हॉइस, हेड मूवमेंट आणि हॅन्ड मोशननं नियंत्रित करता येईल. उदा. तुम्ही तुमचं डोकं हलवून नोटिफिकेशन ओपन आणि क्लोज करू शकाल. हे ग्लासेस तुम्हाला वेदर, हेल्थ आणि नेव्हिगेशनची माहिती डोळ्यांसमोर देऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला वारंवार स्मार्टफोन बघण्याची गरज नाही. तर यातील टेलीप्रॉमप्टर फिचर तुमच्या प्रेजेंटेशनमध्ये मदत करेल. हा स्मार्ट चष्मा चालू संभाषणाचे भाषांतर करू शकतो. सध्या चिनी आणि इंग्रजी भाषेचा सपोर्ट देण्यात आला आहे. लवकरच अन्य भाषा देखील दिल्या जातील.