Oppo नं स्मार्टफोन्ससाठी डेव्हलप केलेलं नेक्स्ट जनरेशन अंडर स्क्रीन कॅमेरा तंत्रज्ञान सादर केलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्मार्टफोनमध्ये उत्तम स्क्रीन एक्सपिरिअन्ससोबतच चांगली इमेज क्लालिटीदेखील मिळणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या तंत्रज्ञानात प्रत्येक पिक्सेलची साईज कमी करण्यासोबतच ट्रान्सपरंट वायरिंग मटेरियल आणि 1 टू 1 पिक्सेल सर्लिट ड्रायव्हिंगचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं या अंडर स्क्रीन कॅमेऱ्याच्या डिव्हाईसचा एक प्रोटोटाईप शेअर केला आहे. यामध्ये फोन फुल स्क्रीन एक्सपिरिअन्स दाखवण्यात आला आहे.
कंपनी बऱ्याच कालावधीपासून आपल्या स्मार्टफोनमध्ये देण्यात येणाऱ्या सेल्फी नॉच आणि पंच होलला हचवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु काही कंपन्यांनी आपल्या युझर्सना फुल स्क्रीन एक्सपिरिअन्स देण्यासाठी पॉप अप सेल्फी कॅमेरा ऑफर केले होते. परंतु त्यामुळे डिव्हाईस वजनानं जड होत होते. तसंच अनेकदा बऱ्याच कारणांमुळे कॅमेऱ्याच्या फंक्शनिंगमध्येही समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या.
२०१९ मध्ये तयार केला प्रोटोटाईपपॉप अप कॅमेऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी अंडर डिस्प्ले कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच ओप्पोनं यावर काम करण्यास सुरूवात केली होती. ओप्पोनं या डिव्हाईसचा प्रोटोटाईप २०१९ मध्ये तयार केला होता. यामध्ये सेल्फी कॅमेऱ्याच्या वरील स्क्रीन हा अतिशय ट्रान्सपरंट मटेरिअलनं तयार करण्यात आला होता. तसंच यासाठी पिक्सेल अरेंजमेंटही निराळे होते. परंतु त्यावेळी याचं कमर्शिअल लाँच करण्यात आलं नव्हतं. सध्या हे तंत्रज्ञान कोणत्या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे, याबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.