Oppo नं भारतात Oppo Enco M32 नावाचे बजेट फ्रेंडली Bluetooth Neckband सादर केले आहेत. या इयरफोन्स किंमत, स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि सेल डेटसह अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आले आहेत. कंपनीनं यात 28 तासांची बॅटरी लाईफ, फास्ट चार्जिंग, IP55 रेटिंग आणि 10 मिमी ड्रायव्हर असे भन्नाट स्पेक्स दिले आहेत.
Oppo Enco M32 ची किंमत
Oppo Enco M32 लाँच ऑफर अंतर्गत डिस्काउंटसह विकत घेता येतील. अॅमेझॉनवरून हे इयरफोन्स सुरुवातीला 300 रुपयांच्या सवलतीनंतर 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येतील. त्यांनंतर हे इयरफोन्स विकत घेण्यासाठी 1,799 रुपये मोजावे लागतील. येत्या 10 जानेवारीपासून हे ओप्पोचे ब्लूटूथ इयरफोन्स प्रोडक्ट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतील.
Oppo Enco M32 चे स्पेसिफिकेशन्स
Oppo Enco M32 इन-इयर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. यात ब्लूटूथ 5.0 ची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. कंपनीनं यात बास बूस्ट टेक्नॉलॉजीसह 10 मिमी डायनॅमिक ड्रायव्हरचा वापर केला आहे. सिंगल चार्जवर Enco M32 इयरफोन्स 28 तास वापरता येतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच घाईत फक्त 10 मिनिटांच्या क्विक चार्जमध्ये 20 तासांचा प्लेबॅक टाइम मिळवता येतो.
यात वॉल्यूम, म्यूजिक आणि कॉल कंट्रोल करण्यासाठी बटन्स मिळतात. Enco M32 मध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंटसाठी IP55 रेटिंग देण्यात आली आहे. तसेच यात ड्युअल डिवाइस स्विचिंग, इंडिपेंडंट बास चेम्बर डिजाइन, कॉलसाठी नॉइज कान्स्लेशन आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट असे फीचर्स देखील मिळतात.
हे देखील वाचा:
1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM
Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत